बुलडाणा- जिल्ह्यातील शेगाव शहरात नागपूर येथील एका विवाहित जोडप्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या जोडप्याने सोमवारी सकाळी गेस्ट हाऊसमध्ये विष पिऊन आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नंदू कृष्णाजी मसराम (वय 40) आणि भारती कैलास सुरपाम (वय 30, दोघेही रा. सालई गोंधणी धामणा, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत.
विवाहबाह्य संबंधातून प्रेमी युगलाची आत्महत्या हेही वाचा - 'पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी माझी'
याबाबत अधिक माहिती अशी, की या प्रेमीयुगुलाने 5 ऑक्टोबरला शेगाव येथे एका खासगी गेस्ट हाऊसमध्ये 205 क्रमांकाची खोली भाड्याने घेतली. ते दोघे 2 दिवस सोबत राहिले. मात्र, सोमवारी सकाळीपासून 205 क्रमांकाच्या खोलीतून हालचाल दिसत नसल्याने आणि प्रतिसाद मिळत नसल्याने गेस्ट हाऊस मालकाने खोलीची पाहणी केली.
हेही वाचा - बुलडाण्यात गारपीटीने पिकांचे नुकसान; शेतकरी हतबल
त्यावेळी नंदू आणि भारती दोघेही मृत अवस्थेत आढळून आले. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. दोघांनी विष पिऊन आपली जीवन यात्रा संपविल्याचे दिसून आले. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रूग्णालयात पाठवण्यात आले आहेत.