महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात प्रेमी युगुलाची आत्महत्या - जलंब पोलीस ठाणे

जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम तरोडा येथील एका शेत शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. संबंधितांनी झाडाला गळफास घेऊस जीवन संपवले असून हा प्रकार गुरुवारी 2 जुलैला उघडकीस आला आहे.

couple hanged themselves in buldana
जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम तरोडा येथील एका शेत शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली.

By

Published : Jul 2, 2020, 6:02 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम तरोडा येथील एका शेत शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. संबंधितांनी झाडाला गळफास घेऊस जीवन संपवले असून हा प्रकार गुरुवारी 2 जुलैला उघडकीस आला आहे. शेगाव येथील 17 वर्षीय युवतीने तर, 22 वर्षाचा युवक रामेश्वर संतोष अहिरे या दोघांनी एकत्र आत्महत्या केली.

शेगांव येथून बुधवारी दुपारपासून हे प्रेमीयुगुल बेपत्ता होते. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी रामेश्वर विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता.

आज गुरुवारी जलंब पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या तरोडा शिवारातील एका शेतात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. यानंतर ते शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

या घटनेनंतर जलंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details