बुलडाणा - मेहकर-सुलतानपूर राज्य महामार्गवारील हॉटेल गारवा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. अपघाताची ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मृत दाम्पत्य हे मेहकर येथील रहिवासी आहे. रामेश्वर सिताराम नालेगावकर (वय 49) आणि पत्नी भाग्यश्री रामेश्वर नालेगावकर अशी त्यांची नावे आहेत.
नालेगावकर हे दांम्पत्य देऊळगाव मही येथून आपल्या मुलीच्या गावाहून स्कुटीवरून घराकडे परतत होते. त्यांची दुचाकी गारवा हॉटेल जवळ आली असता, अज्ञात वाहनाने नालेगावकर यांच्या स्कुटीला माघून जबर धडक दिली आणि हे दाम्पत्य त्या वाहनाखाली येऊन चिरडले गेले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू; मुलीची भेट ठरली अखेरची - मेहकरच्या दाम्पत्याचा मृत्यू
मेहकर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. अपघाताची ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू
या घटनेनंतर मुलीची तिच्या आई वडिलांशी ती अखेरची भेट ठरली आहे. तसेच भाऊबीजेच्या पुर्वसंध्येला हा दुर्दैवी अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. त्यानंतर अज्ञात वाहनांचा पोलीस शोध घेत आहेत.