बुलडाणा - लोणार तालुक्यात एक अल्पवयीन मुलगी आणि एका 23 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. अजीसपूर येथील 13 वर्षीय मुलगी आणि 23 वर्षीय सचिन सावळे यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
लोणारमध्ये प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - लोणार आत्महत्या
13 वर्षीय मुलगी पाणी आणण्यासाठी गेली असता गावातील 23 वर्षीय सचिनने तिला पळवून नेल्याची तक्रार अजीसपूर येथील विश्वनाथ यांनी लोणार पोलिसात दिली होती. त्यानुसार सचिनवर कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गुरुवारी पारडा दराडे शिवारात असलेल्या उद्धव दराडे यांच्या शेतातील विहिरीमध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच लोणारचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, बिट जमादर बन्सी पवार, रवींद्र बोरे, गुलाबराव झोटे, सुरेश काळे, चंद्रशेखर मुरडकर, कुष्णा निकम, सुधाकर काळे, राम गिते हे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.