बुलडाणा -बुलडाणा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, सर्वच आस्थापना, दुकानदार, हॉटेलचालक व त्याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत सर्वांनी चाचणी करावी असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान जे व्यवसायिक कोरोना टेस्ट करणार नाहीत, त्यांची दुकाने सील करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक
बुलडाणा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीमध्ये सर्व दुकानदारांनी कोरोना टेस्ट करून घ्याव्यात असा निर्णय घेण्यात आला.