महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात व्यस्त होते, म्हणूनच मानेचं दुखणं सुरू झालं; किरीट सोमय्यांचं वादग्रस्त वक्तव्य - Buldana Urban Cooperative Credit Society

बायकोच्या नावाने बेकायदेशीर 19 बंगलो बांधले होते ते वाचवण्यात पडले होते. स्व:चा सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर याने बंगला बांधला होता, तो वाचवण्यात ते व्यस्त होते. अनिल परब यांनी कोविड काळात मार्च 2020 मध्ये इलेक्ट्रिकचे कनेक्शन घेतले होते. रिसॉर्ट बांधण्यासाठी आणि उद्घाटन केले. 2021 मध्ये त्यामध्ये बिझी होते, अशीही टिका यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांना लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा देखील दिल्या.

किरीट सोमय्या-उद्धव ठाकरे
किरीट सोमय्या-उद्धव ठाकरे

By

Published : Nov 13, 2021, 10:00 AM IST

बुलडाणा- उद्धव ठाकरे कोरोनाकाळात पैसे मोजण्यात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना मान वर करायला वेळ मिळाला नाही. म्हणूनच त्यांना मानेच दुखणं सुरू झालं, अशी टीका किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी बुलडाण्यात पत्रकार परिषदेत केली. बायकोच्या नावाने बेकायदेशीर 19 बंगलो बांधले होते ते वाचवण्यात पडले होते. स्व:चा सेक्रेटरी मिलिंद नार्वेकर याने बंगला बांधला होता, तो वाचवण्यात ते व्यस्त होते. अनिल परब यांनी कोविड काळात मार्च 2020 मध्ये इलेक्ट्रिकचे कनेक्शन घेतले होते. रिसॉर्ट बांधण्यासाठी आणि उद्घाटन केले. 2021 मध्ये त्यामध्ये बिझी होते, अशीही टिका यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांना लवकर बरे व्हावेत अशा शुभेच्छा देखील दिल्या.

उद्धव ठाकरे पैसे मोजण्यात व्यस्त होते, म्हणूनच मानेचं दुखणं सुरू झालं

31 डिसेंबरपर्यंत ठाकरे सरकारचे 40 चोर बाहेर काढणार -

किरीट सोमय्या शुक्रवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी मागील काही दिवसापूर्वी बुलडाणा अर्बन सहकारी पतसंस्थेत (Buldana Urban Cooperative Credit Society) आयकर विभागाच्या चाचपणी केली होती. तर काही खात्यांबाबत कागदपत्रे पूर्ण करून घेण्याच्या सूचना संस्थेला दिल्या होत्या. दुसरीकडे भाजपा नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लाँडरींग झाले आहे, असा दावाही सोमय्यांनी केला होता. याचसंदर्भात सोमय्या यांनी बुलडाणा अर्बन या पतसंस्थेत जाऊन चौकशी केली व पतसंस्था पूर्ण सहकार्य करत आहे आणि पुढेही करेल अशी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे सरकार आलं तेव्हापासून राज्यात घोटाळेबाज मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येत असून येत्या 31 डिसेंबर पर्यंत अलिबाबा चाळीस चोर सरकार मधील 40 चोर बाहेर काढणार आहे, अशी घोषणा किरीट सोमय्या यांनी बुलडाण्यात केली.

ABOUT THE AUTHOR

...view details