महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळे देशात कोरोना हत्याकांड घडले, नाना पटोलेंचा घणाघात - नाना पटोलेंची नरेंद्र मोदीवर टीका

कोरोनाकाळात अनेक लोकांचा बळी गेला याबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी देशवासीयांच्या माफी मागितली पाहिजे. हे कृत्य झालेले त्यांच्याच चुकीमुळे झालेले आहे. जसे जालियानवाला बाग हत्याकांड झालं होतं, तशी परिस्थिती देशामध्ये निर्माण करण्यामध्ये केंद्र सरकारचा हात आहे. देशामध्ये एक हत्याकांड या कोरोनाच्या काळामध्ये मोदी सरकारने घडवले आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाण्यात केला.

Nana Patole on Narendra Modi
Nana Patole on Narendra Modi

By

Published : Aug 18, 2021, 4:34 PM IST

Updated : Aug 18, 2021, 4:44 PM IST

बुलडाणा -कोरोनाकाळात अनेक लोकांचा बळी गेला याबद्दल देशाच्या पंतप्रधानांनी देशवासीयांच्या माफी मागितली पाहिजे. हे कृत्य झालेले त्यांच्याच चुकीमुळे झालेले आहे. जसे जालियानवाला बाग हत्याकांड झालं होतं, तशी परिस्थिती देशामध्ये निर्माण करण्यामध्ये केंद्र सरकारचा हात आहे. देशामध्ये एक हत्याकांड या कोरोनाच्या काळामध्ये मोदी सरकारने घडवले आहे, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडाण्यात केला.

प्रतिक्रिया देताना नाना पटोले
नाना पटोले बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथे आगामी जिल्हा परिषद, जिल्हा कृषिउत्पन्न बाजार समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीसदर्भात विजय संकल्प मेळाव्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी भर पावसात मशाल पेटवून काँग्रेस कार्यकर्त्यांना शपथ दिली. त्यांनतर प्रसारमाध्यमांसमोर बोलताना पटोले म्हणाले, की कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या परिवारासाठी दिल्ली सरकारच्या धर्तीवर आपणही महाराष्ट्रात काही मदत योजना सुरू करणार का, असा सवाल करत पंतप्रधानांना घणाघाती आरोप केला.
नवी ऊर्जा निर्माण झाली -मंगळवारी 17 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसचा विजय संकल्प मेळावा आयोजित केला होता. दुपारी दोन वाजता असलेला हा मेळावा रात्री नऊ वाजता प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आगमनानंतर झाला. यावेळी मंचावरून नाना पटोले आणि इतर नेत्यांनी मशाली पेटवून काँग्रेस जनांना शपथ दिली. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.
Last Updated : Aug 18, 2021, 4:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details