बुलडाणा -राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष आहे आणि त्यांच्याकडून अद्यापही येणाऱ्या निवडणुका सोबत लढवण्याबाबत कोणताच प्रस्ताव आला नाही. मात्र, आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीकडून पुढे प्रस्ताव आल्यास पाहू, असे स्पष्टीकरण काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. शरद पवार यांनी हे सरकार 5 वर्षे टिकेल म्हणत पुढील काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढेल, असे सूतोवाच केले होते.
येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची काँग्रेसची तयारी - नाना पटोले
मित्र पक्षाकडून येणाऱ्या निवडणुका सोबत लढण्याबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याने सध्या स्वबळाचीच तयारी करत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
नाना पटोले
नाना पटोले हे बुधवारपासून (दि. 9 जून) दोन दिवसीय बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. खांमगाव मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी ते खांमगावात आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी पुढील काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढु, असे स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा -भाजपाने खुर्चीसाठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप केले - नाना पटोले
Last Updated : Jun 10, 2021, 8:21 PM IST