बुलडाणा - भाजपच्या वतीने महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. मात्र, भाजपची ही जन आशीर्वाद यात्रा ही पेट्रोल-डिझेलला 200 रुपयेपर्यंत नेण्यासाठी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुलडण्यातून केली.
ते बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव येथे आगामी जिल्हा परिषद, जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती व नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात विजय निर्धार मेळाव्यासाठी ते मंगळवारी (दि. 17 ऑगस्ट) रात्री उशिरा ते खामगाव येथील कार्यक्रमाला पोहचले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी भर पावसात मशाल पेटवून कांग्रेसजन यांना शपथ दिली.