महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारत बंदच्या समर्थनार्थ बुलडाण्यात काँग्रेसचे एक दिवसीय उपोषण

शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. याच बंदच्या समर्थनात प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कृषी कायदे रद्द करा,वाढलेली महागाई कमी करा व बेरोजगारांना रोजगार द्या अशा मागण्या करत हे उपोषण करण्यात आले.

कॉंग्रेस आंदोलन
कॉंग्रेस आंदोलन

By

Published : Mar 26, 2021, 7:22 PM IST

बुलडाणा- केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी आज (शुक्रवारी) पुकारला आहे. भारत बंदच्या समर्थनात सक्रीय पाठींबा जाहीर करत कृषी कायदे रद्द करावे तसेच महागाई व बेरोजगारी विरोधात बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाभर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. राष्ट्रीय उपाध्यक्ष भाई नगराळे व जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली बुलडाण्याच्या स्थानिक जयस्तंभ चौकात उपोषण करण्यात आले.

प्रदेश काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या भारत बंदला समर्थनाच्या सूचना
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी सुधारणा कायद्याला काळे कायदे संबोधत हे कायदे रद्द करावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर मागील चार महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत जवळपास ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली आहे. याच बंदच्या समर्थनार्थ प्रदेश काँग्रेसच्या आदेशाने जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाभर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. कृषी कायदे रद्द करा,वाढलेली महागाई कमी करा व बेरोजगारांना रोजगार द्या अशा मागण्या करत हे उपोषण करण्यात आले.

कॉंग्रेस उपोषण
राष्ट्रवादी काँग्रेसचाही पाठींबा
शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनात राष्ट्रवादी काँगेसने पाठींबा देत काँग्रेसच्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात सहभाग नोंदविला आहे. या उपोषणात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार,ज्योतीताई पडघान ,उषाताई चाटे,ज्ञानेश्वर सुरशे,सुनील तायडे,किशोर साखरे,मधुकर पालकर आदीची उपस्थिती पहायला मिळाली.

ABOUT THE AUTHOR

...view details