बुलढाणा :प्रेमप्रकरणातून रोजच धक्कादायक घटना समोर येत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा येथील कॉंग्रेस शहराध्यक्षाने गर्लफ्रेंडने धोका दिल्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. अपनी रानी किसी की दीवानी हो गई अशा आशयाचे त्याने व्हाट्सअप व इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवत आत्महत्या केली आहे.
प्रेमप्रकरणातून आत्महत्या : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यात देऊळगाव मही येथील काँग्रेसच्या अल्पसंख्यांक सेलच्या शहराध्यक्ष गजानन गुरव या 26 वर्षीय युवकाने गर्लफ्रेंडने धोका दिला म्हणून आत्महत्या केली आहे. गावातीलच एका युवतीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र, या युवतीने दुसऱ्याशी आपले नाते जुळवल्यामुळे नैराश्यातून गजानन गुरव याने खंडोबा मंदिर परिसरात आत्महत्या केली आहे. आपल्या प्रियसीने प्रेमात धोका दिला असल्याचे गजाननने आपल्या व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टाग्रामच्या स्टेटस वर व्हिडिओ ठेवत आत्महत्या केली आहे. आपल्या मित्र परिवाराला भावनिक स्टेटस सुद्धा गजाननाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिले होतं. त्यामुळे गर्लफ्रेंडने प्रेमात धोका दिल्याने, अपनी राणी किसी की दीवानी हो गई, असे म्हणत या युवकाने आपली जीवन यात्रा संपवली आहे.