बुलडाणा - निवडणूक विभागामार्फत दिलेल्या मतदार पडताळणीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मेहकर तालुक्यातील ७१ शिक्षकांवर कारवाई करण्यात आली. ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असून या शिक्षकांनी शून्य टक्के काम केल्याचे निदर्शनास आले आहे.
११ नव्हेंबर ते १३ फेब्रुवारी दरम्यान बीएलओ हायब्रीड अॅपनुसार निवडणूक विभागाने मतदार पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात मेहकर तालुक्यातील २ लाख १७ हजार ८८ मतदारांचे पुनर्निरीक्षण करायचे होते. यासाठी २४१ शिक्षकांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, तीन महिने उलटूनही मेहकर तालुक्यातील मतदार पडताळणीचे सात टक्केच काम झाले आहे. निवडणूक विभागाने या बीएलओ शिक्षकांना वेळोवेळी सूचना दिल्या. कारणे दाखवा नोटीसाही दिल्या मात्र, याचा परिणाम झाला नाही.