बुलडाणा - निवडणूक आयोगाने आचार संहिता भंग प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी 'सी-व्हिजिल' अॅप सुरू केले आहे. आचार संहिता लागून झाल्यापासून सर्वच ठिकाणी मत्र्यांचे, आमदारांचे आणि खासदारांचे पोस्टर, बॅनर काढण्यात आलेले आहेत. मात्र, काही वेबसाईट्स आणि काही शासकीय अॅप्सवरून अद्यापही राजकीय व्यक्तींचे फोटो हटलेले नाहीत. याप्रकरणी या अॅपवर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'आपले सरकार' पोर्टलवर मुख्यमंत्र्यांचा फोटो, आचार संहिता भंग प्रकरणी सी-व्हिजिल अॅपवर तक्रार दाखल - buldana
'आपले सरकार' नावाच्या सरकारी वेब पोर्टलच्या मोबाईल अॅपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो अद्यापही कायम आहे. मोबाईमध्ये अॅप उघडताच त्यावर फडणवीस यांचा फोटो समोर येतो.
!['आपले सरकार' पोर्टलवर मुख्यमंत्र्यांचा फोटो, आचार संहिता भंग प्रकरणी सी-व्हिजिल अॅपवर तक्रार दाखल](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2931115-thumbnail-3x2-cm.jpg)
'आपले सरकार' पोर्टलवर मुख्यमंत्र्यांचा फोटो, आचार संहिता भंग प्रकरणी सी-व्हिजिल अॅपवर तक्रार दाखल
बि एस घूगे (नोडल ऑफिसर आदर्श आचार संहिता कक्ष, बुलडाणा)
'आपले सरकार' नावाच्या सरकारी वेब पोर्टलच्या मोबाईल अॅपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो अद्यापही कायम आहे. मोबाईमध्ये अॅप उघडताच त्यावर फडणवीस यांचा फोटो समोर येतो. यामुळे १ एप्रिल रोजी आचार संहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाच्या 'सी-विजिल' अॅपवर करण्यात आली आहे. प्रकरणी याची चौकशी सुरू आहे.