बुलडाणा - दीड महिन्यापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीत नैसर्गिक आपत्तीत घराचे व पशुधनाचे नुकसान झालेल्यांना शासनाकडून 52 लाख 71 हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. बुलडाणा, सिंदखेडराजा, मेहकर खामगाव, शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर या 8 तालुक्यात नुकसानग्रस्तांना तहसील कार्यालयामार्फत निधी वाटप करण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्तांना शासनाकडून 52 लाखांची मदत बुलडाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यांना मदत
सप्टेंबर महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाचे व काहींचे तर घरांचेदेखील नुकसान झाले होते. यामध्ये बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद व संग्रामपूर या तालुक्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे नुकसान झाले होते. काहींना पहिल्या टप्प्यात नुकसान भरपाई देण्यात आली होती. तर उर्वरित नुकसानग्रस्तांकडून भरपाईची मागणी करण्यात आली होती. अखेर 16 ऑक्टोबरला शासनाने महसूल व वनविभागाच्या शासननिर्णयाने राज्यातील अनेक जिल्ह्याला नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्त झालेल्यांना मदतनिधी देण्यात आला आहे.
यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला 52 लाख 71 हजार रुपयांची मदत निधी देण्यात आला आहे. हा निधी 23 ऑक्टोबरला जिल्ह्यातील आठ तहसीलमधील नुकसानग्रस्तांना वितरित करण्यात आल्याची माहिती बुलडाणा निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीत नुकसानग्रस्तांना मदत देण्यात आले तालुके व रक्कम
- बुलडाणा - 4 लाख 94 हजार 500 रुपये
- सिंदखेडराजा - 12 लाख रुपये
- मेहकर - 4 लाख 28 हजार 800 रुपये
- खामगाव -12 लाख रुपये
- शेगाव - 11 लाख 30 हजार रुपये
- नांदुरा -4 लाख 5 हजार रुपये
- जळगाव जामोद - 12 हजार 700 रुपये
- संग्रामपूर - 4 लाख रुपये