बुलडाणा -जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या महामारीच्या काळात खासगी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आपली रुग्णसेवा जीव धोक्यात घालून देत आहेत. पहिल्या टप्प्यात कोरोना संक्रमण कमी करण्याचे मोठे कार्य या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. मात्र, चिखली येथील 10 खासगी कोविड रुग्णालयात रुग्णसेवा देणाऱ्या 13 डॉक्टरांनी आपले सामूहिक राजीनामे अचानक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे दिले आहेत.
माहिती देताना मेडिकल असोसिएशन चिखलीचे अध्यक्ष डॉ. सुहास खेडेकर रुग्ण सेवा देत असताना सततचा राजकीय हस्तक्षेप होत असल्याने वाढलेल्या ताणामुळे राजीनामे देत आहे, असे कारण देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा -अमेरिकेत पूर्ण लसीकरण झालेल्यांना मास्कची सक्ती नाही!
सतत राजकीय हस्तक्षेप वाढवला जातोय
बुलडाणा जिल्हा अगोदरच कोरोना हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात आहे. दररोज हजारच्यावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय रुग्णालयात कुठेही बेड उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत काही रुग्ण खासगी कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, खासगी रुग्णालयात कोणताही राजकीय पुढारी, नेता येऊन धमक्या देत आहेत, सतत राजकीय हस्तक्षेप वाढवला जात आहे. तसेच ऑक्सिजन तुटवडा व रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा यामुळे खासगी रुग्णालये चालवणे कठीण झाले असून, मानसिक त्रास वाढला आहे. त्यांमुळे सामूहिक राजीनामें देण्याचे ठरवून चिखली येथील सर्व खासगी रुग्णालयातील 13 डॉक्टरांनी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे सामूहिक राजीनाम्यांचे पत्र दिले आहे. आता पालकमंत्री या राजीनामा पत्रांवर काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्यावासियांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -सिंधुदुर्ग व गोव्यात हायअलर्ट; किनारी भागात वाहू लागले जोरदार वारे