बुलडाणा- आजच्या युगात पारंपरिक व्यवसाय, उद्योगात अनेक नवनवीन बदल पाहायला मिळतात. पूर्वी उन्हाळ्यात थंड पाण्यासाठी आजही मातीच्या माठाला जास्त मागणी असते. मात्र, कोरोनामुळे या व्यवसायावर मंदी पहायला मिळत आहे.
कोरोनाचा कहर गरीबांच्या 'फ्रीज'ची मागणी थंडावली - बुलडाणा जिल्हा बातमी
कोरोनाचा फटका अनेक व्यवसायाला बसला असून यात गरीबांचा फ्रीज समजला जाणाऱ्या माठाची मागणीही मोठ्या प्रमाणात घटली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. या काळात थंड पाण्याने तहान भागवण्यासाठी गरिबांचा फ्रिज म्हणून ओळख असलेल्या माठाला दरवर्षी चांगलीच मागणी असते. मात्र, यंदा माठ विक्रेत्याकडे नागरिकांचा ओघ तुरळक असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या व्यवसायाला फटका बसला असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या बाजारात गरिबाचे फ्रीज मानले जाणारे मातीचे माठ विक्रीसाठी आले आहेत. मात्र, कोरोनामुळे या कुंभार व्यवसायावर मंदी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या पारंपरिक व्यवसायावर मंदी आल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा -बुलडाण्यात फुलला.. होळीचा व नवनिर्मितीचा संकेत देणारा पळस