बुलडाणा - येथील शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील मुलावर लैंगिक अत्याचार करणार्या काळजीवाहकाला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा न्यायालयाने हा आदेश दिला. निवृत्ती बारीकराव राजपूत असे गुन्हेगाराचे नाव आहे. तसेच त्याला 60 हजार रुपयांच्या दंडदेखील ठोठावण्यात आला आहे.
लहान मुलाच्या लैंगिक छळ प्रकरण 27 ऑगस्ट 2017 रोजी शासकीय मुलांचे निरीक्षण गृहातील प्रवेशित 16 वर्षीय मुलावर रात्री झोपेत असताना सदर गुन्हेगाराने त्याचा लैंगिक छळ केला होता. तसेच दुसर्याही प्रवेशित मुलासह 28 जुलै ते 1 ऑगस्ट 2017 दरम्यान निरीक्षण गृहात वास्तव्यास असताना त्याच्यासोबत देखील अनैसर्गिक अत्याचार केला होता. याबाबत निरीक्षण गृह अधिक्षक भाऊराव राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा -मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सायलेंट रिसॉर्टजवळ हेल्मेटधारक दुचाकीस्वाराचा जीवघेणा गोळीबार
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण 16 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल वसंत भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद केला आणि आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली होती. साक्षी पुरावे ग्राह्य धरून निवृत्ती राजपूत याला 5 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच 60 हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावण्यात आला आहे. तर दंड न भरल्यास अनुक्रमे 3 महिने आणि 1 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडाच्या रकमेपैकी 25 हजार रुपये पिडीत मुलाला नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश देखील पारित केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मनोज सुरवाडे, उपनिरीक्षक व्यंकटराव कवास यांनी केला. तर कोर्ट पैरवी म्हणून किशोर तांगडे यांचे सहकार्य लाभले.