महाराष्ट्र

maharashtra

दोघा नराधमांना फाशी द्या, 'त्या' घटनेच्या निषेधार्थ चिखलीकरांकडून भव्य रॅली काढून निषेध

नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खटला जलदगतीने चालवण्यात यावा आणि पीडितेच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, या मागण्यांसाठी आणि घटनेच्या निषेधार्थ चिखली बंदची हाक देण्यात आली होती.

By

Published : Apr 30, 2019, 9:02 AM IST

Published : Apr 30, 2019, 9:02 AM IST

चिखलीकर ग्रामस्थ निवेदन देताना

बुलडाणा- चिखली येथे २७ एप्रिलला रात्री १ वाजण्याच्या दरम्यान २ नराधमांनी ९ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. या घटनेच्या निषेधार्ध चिखलीच्या ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने रॅली काढली आणि दोघा नराधमांना त्वरीत निकाल देत फाशी देण्याची मागणी केली. यावेळी चिखलीकर ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला होता.

चिखलीकर ग्रामस्थांची रॅली आणि प्रतिक्रिया

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर, एकाला चिखली न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी दिली आहे. नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खटला जलदगतीने चालवण्यात यावा आणि पीडितेच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी, या मागण्यांसाठी आणि घटनेच्या निषधार्थ चिखली बंदची हाक देण्यात आली होती. ग्रामस्थांनी मागण्याचे निवेदन प्रशासनाला दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details