महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'डी' फॉर 'देवेंद्र', 'डी' फॉर 'डेव्हलपमेंट' अॅण्ड 'डी' फॉर...श्वेता महालेंचा व्हिडीओ व्हायरल - चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार श्वेता महाले

चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार श्वेता महाले यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

श्वेता महाले

By

Published : Oct 19, 2019, 2:25 PM IST

बुलडाणा - चिखली मतदारसंघातील भाजप उमेदवार श्वेता महालेंची खिल्ली उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्या एका इंग्रजी माध्यमाला मुलाखत देताना इंग्रजीचाच शब्द विसरल्या आहेत. पुढचा इंग्रजीचा शब्द काय आहे? याचा विचार करती आहेत. त्यामुळे विरोधक मराठीच्या नावावर त्यांच्यावर टीका करीत आहेत.

श्वेता महालेंचा व्हायरल व्हिडीओ

श्वेता महाले मुलाखतीमध्ये इंग्रजीत 'डी' फॉर 'देवेंद्र', 'डी' फॉर 'डेव्हलपमेंट' अॅण्ड 'डी' फॉर हा शब्द त्या विसरल्या आहेत. थोडा वेळ थांबून पुढचा इंग्रजीचा शब्द त्यांना आठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आठवला नाही. उलट त्यांना खोकला आला. तेवढ्यात एका कार्यकर्त्याने ताई मराठीत बोला आम्हाला समजते, असे म्हटले. त्यानंतर बाजूला उभे असलेल्यांनी त्याला सांगितले. यावरून नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांची चांगलीच खिल्ली उडवली.

ABOUT THE AUTHOR

...view details