बुलडाणा - जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शुक्रवारी 5 जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराला भेट दिली. लोणार येथील वनकुटी व्हू पॉईन्ट आणि धारातीर्थ गोमुख परिसरात जाऊन त्यांनी सरोवराची पाहणी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोणार सरोवर भेट हेही वाचा -मुख्यमंत्र्यांनी केली गोसे धरणाची पाहणी; पालकमंत्र्यांची अनुपस्थिती, प्रकल्पग्रस्तांची निराशा
आज मुख्यमंत्री ठाकरे अधिकार्यांची विशेष बैठक घेऊन लोणार विकास आराखड्यासंदर्भात अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासनचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी दिलीपकुमार सानंदा यांच्यासह अधिकारी होते.
हेही वाचा -'बाळासाहेब ठाकरेंमुळेच सेनेला कोकणात मतं मिळतात; उद्धव ठाकरेंमुळे नाही'