बुलडाणा -जिल्ह्यातील जगविख्यात लोणार सरोवराला आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे उद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, ते लोणार येथे येणार आहेत. दौऱ्यादरम्यान ते लोणार सरोवराची पाहणी करतील. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे प्रशासन कामाला लागले आहे.
हेही वाचा -बुलडाणा: 527 ग्रामपंचायतींचे सरपंच निवडले जाणार तीन टप्प्यांमध्ये
या दौऱ्यानिमित्त लोणार विकासासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध असून सरोवराचा विकास अद्याप झालेला नाही. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा अचानक लोणार सरोवर दौरा जाहीर झाल्याने प्रत्येकाच्या भुवया उंचवल्या आहेत.