बुलडाणा- चर्मकार समाजाचे आराध्य दैवत थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथील मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडले होते. हे मंदिर पुन्हा तिथेच निर्माण करावे, यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. यावेळी चर्मकार समाजाच्यावतीने विविध घोषणाबाजी करत केंद्र व दिल्ली सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच त्याच ठिकाणी पुन्हा मंदिर बांधण्याची मागणी यावेळी केली.
संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिर निर्माणासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने बुलडाण्यात धरणे आंदोलन - चर्मकार समाज
चर्मकार समाजाचे आराध्य दैवत थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथील मंदिर दिल्ली प्रशासनाने पाडले होते. हे मंदिर पुन्हा तिथेच निर्माण करावे, यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
चर्मकार समाजाचे आराध्य दैवत मानवतावादी विज्ञानवादी थोर संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचे तुगलकाबाद दिल्ली येथे मंदिर होते. या मंदिरला दिल्ली सम्राट सिकंदर लोधी यांनी गुरू रविदास महाराजांना गुरू मानून दक्षणेच्या स्वरुपात 12 एकर जमीन दान दिलेली होती. या मंदिराचा जीर्णोद्धार तत्कालीन उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांनी केले होते. असे असताना केंद्र सरकार व दिल्ली सरकार यांनी संगनमत करून हे पाडलेले आहे. त्यामुळे देशातील सर्वच चर्मकार समाजात संतापाची लाट उसळलेली आहे. यामुळे तात्काळ संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे तुगलकाबाद दिल्ली येथे मंदिर बांधण्यात यावे, यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने धरणे आंदोलन केले आहे.