महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल अर्णब गोस्वामी विरोधात बुलडाण्यात गुन्हे दाखल - माजी आमदार राहूल बोंद्रे

अर्णब रंजन गोस्वामीने सोनिया गांधी यांच्याबद्दल असभ्य शब्द प्रयोग केले. दोन धर्मांत वैर वाढवण्याच्या उद्देशाने आणि एकमेकांविरोधात हिंसाचार घडवून देशाची परिस्थती बिघडवण्यासाठी लोकांना भडकवणारे वक्तव्य केले आहे, असा आरोप ठेवून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहूल बोंद्रे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गोस्वामी विरुद्ध तक्रार दिली.

Sonia Gandhi
सोनिया गांधी

By

Published : Apr 24, 2020, 7:41 AM IST

बुलडाणा -काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणे आणि देशात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करणे याप्रकरणी एका हिंदी टिव्ही चॅनलचे संपादक अर्णब रंजन गोस्वामी विरोधात बुलडाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहूल बोंद्रे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गोस्वामी विरुद्ध तक्रार दिली.

सोनीया गांधी आणि अर्णब गोस्वामी

अर्णब रंजन गोस्वामी हे एका टिव्ही या न्यूज चॅनलचे कार्यकारी संचालक आणि संस्थापक संपादक आहे. त्यावर ते स्वतः 'पूछता है भारत' हा वादविवाद कार्यक्रम घेतात. त्यामध्ये १६ एप्रिलला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये २ हिंदू साधूंच्या झालेल्या खून प्रकरणाबाबत चर्चा सुरू होती. गोस्वामी यांनी सोनिया गांधी यांच्याबद्दल असभ्य शब्द प्रयोग केले. यावेळी धर्मांत वैर वाढवण्याच्या उद्देशाने आणि एकमेकांविरोधात हिंसाचार घडवून देशाची परिस्थती बिघडवण्यासाठी लोकांना भडकवणारे वक्तव्यही केले आहे.

अर्णब गोस्वामी विरोधात तक्रार देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहूल बोंद्रे

अर्णब गोस्वामीच्या या वक्तव्यामुळे भारतातील विविध भागात अल्पसंख्यांक समुदायामध्ये असुरक्षिततेची व भीतीची भावना निर्माण झाली आहे. म्हणून त्या विरोधात तत्काळ कारवाई करण्याची मागणी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, सचिव माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, लक्ष्मणराव घुमरे, अ‍ॅड.शरद राखोंडे, दत्ता काकस, अ‍ॅड.राज शेख, मो. अजहर, जाकिर कुरेशी, गजनफर खान आदींनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details