बुलडाणा- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाईट नऊ मिनिटाकरिता बंद करण्यास सांगितले आहे. आपल्या घराच्या गॅलरीत येत मोबाईल फ्लॅश, मेणबत्ती आणि दिवे जाळण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. कोरोनापासून लढण्याची एकजूट दाखविण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे.
'नऊ मिनिटे लाईट बंद केल्यास महावितरण कंपनीचे नुकसान, विद्युत दाब येणार ही अफवा' - pm modi's decision about ight off
एकाच वेळी लाईट बंद केली आणि एकाच वेळी सुरु केली तर विद्युतावर मोठ्या प्रमाणावर दाब येणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, ही सर्व अफवा असून एकाच वेळी लाईट बंद चालू केल्याने विद्युतावर कुठल्याच प्रकारचा दाब येणार नसल्याचे विद्युत महावितरण सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पंडित यांनी सांगितले.
या आवाहानानंतर एकाच वेळी लाईट बंद केली आणि एकाच वेळी सुरु केली तर विद्युतावर मोठ्या प्रमाणावर दाब येणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, ही सर्व अफवा असून एकाच वेळी लाईट बंद चालू केल्याने विद्युतावर कुठल्याच प्रकारचा दाब येणार नसल्याचे विद्युत महावितरण सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पंडित यांनी सांगितले. उलट यामुळे विद्युत महावितरण कंपनीचे नुकसान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ज्यावेळी संपूर्णपणे लाईट जाते आणि अचानक येते तेव्हा विद्युतावर दाब येत नाही, असे उदाहरण ही त्यांनी दिले. या नऊ मिनिटात जे विद्युत बंद राहिल त्यामुळे प्रत्येकाच्या विद्युतच्या बिलामध्ये 1 ते 2 रुपयांचा फरक पडू शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. चंद्रशेखर पंडित हे विद्युत महावितरण कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. जून 2014 रोजी रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव या शहरात वास्तव्याला आहेत.