महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jijamata Janmotsav : सिंदखेडराजा जन्मस्थळी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा - माँ जिजाऊ यांचा जन्मोत्सव

सिंदखेडराजा ( Sindkhed Raja ) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी म्हणजे राजे लखोजी जाधव ( Raje Lakhoji Jadhav ) यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी पहाटे साडेपाच वाजता जिजाऊंच्या 13 व्या वंशजांनी महापूजन केले. यावेळी कोरोनाचे निर्बंध असल्याने मोजक्याच 50 जणांना प्रवेश देण्यात आला. महापूजन झाल्यानंतर माँ जिजाऊ यांना वंदन करण्यात आले.

राजमात जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा
राजमात जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा

By

Published : Jan 12, 2022, 10:10 AM IST

Updated : Jan 12, 2022, 10:43 AM IST

बुलढाणा - आज 12 जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस ( Birth Anniversary of Jijamata ) . यानिमित्ताने सिंदखेडराजा ( Sindkhed Raja ) येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी म्हणजे राजे लखोजी जाधव ( Raje Lakhoji Jadhav ) यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी पहाटे साडेपाच वाजता जिजाऊंच्या 13 व्या वंशजांनी महापूजन केले. यावेळी कोरोनाचे निर्बंध असल्याने मोजक्याच 50 जणांना प्रवेश देण्यात आला. महापूजन झाल्यानंतर माँ जिजाऊ यांना वंदन करण्यात आले. शासकीय पूजन ( Government Worship ) झाल्याने कोरोना निर्बंधांमुळे लगेच राजवाडा बंद करण्यात आला.

Jijamata Janmotsav

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे दरवर्षी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांचा जन्मउत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी राज्यातील हजारो भाविक येथे जिजाऊंचे दर्शन घेण्यासाठी येतात. दिवसभर येथे नानाविध कार्यक्रम होत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे सर्व कार्यक्रम साध्या पध्दतीने करण्यात आले. या कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे येथे जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. जिजाऊवर श्रद्धा ठेवणाऱ्यांची संख्या देशातील कानाकोपऱ्यात आहे.

कोरोनाचे निर्बंध असल्याने हा उत्सव मोजक्याच 50 जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी आज सकाळी साडेपाच वाजता जिजाऊंच्या 13 व्या वंशजांनी विधिवत महापूजन केले. शांततेत आणि मोजक्याच पूजेचा कार्यक्रम करण्यात आला. कुठलाही गाजावाजा करण्यात आला नाही. तत्पूर्वी मात्र, माँ जिजाऊ यांच्या राजवाड्यावर आणि माँ साहेब यांच्या सुष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. जिजाऊ उत्सवाला येणाऱ्या प्रत्येकाचे आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीचे दोन्ही डोस असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. त्यामुळे तिसऱ्या वर्षीही जिजाऊ जन्मोत्सव साध्यापद्धतीने साजरा झाला.

Last Updated : Jan 12, 2022, 10:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details