बुलडाणा - यंदा सर्वच सण-उत्सवांवर कोरोनाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे. आज राज्यात कोरोनाबाबत योग्य ती खबरदीरी घेऊन विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाण्यात अनेक ठिकाणी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत रावनाचे दहन करण्यात आले. शहरातील धांडे ले आऊट परिसरात कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी कोरोनारुपी रावणाचे दहन करण्यात आले. कुठल्याही प्रकारची आतिषबाजी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत रावण दहन करण्यात आले.
बुलडाण्यात कोरोनारुपी रावणाचे दहन
आज राज्यात कोरोनाबाबत योग्य ती खबरदीरी घेऊन विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुलडाण्यात अनेक ठिकाणी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत रावनाचे दहन करण्यात आले. शहरातील धांडे ले आऊट परिसरात कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी कोरोनारुपी रावनाचे दहन करण्यात आले.
कोरोनारुपी रावनाचे दहन
दरम्यान गेल्या सात महिन्यांपासून देशात कोरोनाच्या साथीने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने आणि शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत साजरा करण्यात आले. शहरात आज अनेक ठिकाणी योग्य ती खबरदारी घेत रावणाचे दहन करण्यात आले. शहरातील धांडे ले आऊट परिसरात कोरोना रुपी रावनाचे दहन करून, देशावरील कोरोनाचे संकट लवकर दूर होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली.