बुलडाणा -येथील मराठा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण जेऊघाले यांच्यासह त्यांच्या आई-वडीलांवर मारहाणीचा आरोप वरवंड येथील शेतकरी संदीप जेऊघाले यांनी केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी बुलडाणा ग्रामीण पोलिसांत केली आहे. शेत धुऱ्याच्या वादातून मारहाण झाल्याचे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी श्रीकृष्ण जेऊघाले व त्यांच्या आई वडिलांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
संदीप जेऊघाले यांची प्रतिक्रिया धुऱ्याच्या वादातून मारहाण -
माझ्या आईच्या नावाने ग्राम वरवंड शिवारात गट क्र. 152 मधे चार एकर शेत असून आमच्या शेता शेजारी मराठा अर्बन पतसंसतेचे अध्यक्ष रूस्तम सदाशिव जेउघाले यांचे शेत आहे. ते नेहमी शेतातील धुऱ्याच्या कारणावरून आमच्या सोबत वाद घालतात. 19 जानेवारीला सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान मी माझ्या शेतात स्पिंक्लर सेट बदलण्यासाठी गेलो असता, श्रीकृष्ण रूस्तुम जेउघाले त्यांचे वडील रूस्तुम सदाशिव जेउघाले व त्यांची आई प्रमीला रूस्तुम जेउघाले हे माझ्या शेतातील धुऱ्यावर दगड व माती टाकीत होते. त्यावेळी मी त्यांना आमच्या धुऱ्यावर दगड व माती टाकू नका, असे म्हटले असता श्रीकृष्ण जेऊघाले व रूस्तुम जेउघाले यांनी मला चापटा-बुक्यांनी मारहाण केली व तिघांनी मला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असेही संदीप जेऊघाले यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मराठा अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण जेऊघाले यांनी सदर प्रकरणावर बोलण्यास नकार दिला.
हेही वाचा - नंदुरबार : मजुरांना घेऊन जाणारी जीप दरीत कोसळली, ६ जागीच ठार