बुलडाणा- सावत्र आईने आठ वर्षीय मुलाला गरम तव्यावर उभे केल्याने चिमुकल्याचे पाय भाजले आहेत. ही घटना नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार येथे घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलाचा मामा वैभव मानकर (वय 19 वर्षे, रा.जयपूर लांडे) याने शनिवारी (27 डिसें.) दिलेल्या तक्रारीवरुन बोराखेडी पोलीस ठाण्यात सावत्र आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा, असे त्या सावत्र आईचे नाव आहे.
दरम्यान, आरोपी आईला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला जामिन देण्यात आला आहे. पीडित मुलावर बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे.