बुलडाणा- येथे भरधाव वेगात असलेली प्रवासी कार उलटल्याने दोघे जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी खामगाव- चिखली रोडवरील अत्रंज फाट्या जवळ ही घटना घडली आहे. मृतकामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील दोन शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते.
नियंत्रण सुटल्याने खामगाव-चिखली मार्गावर कार उलटली, दोन ठार तीन जखमी - बुलढाणा बातमी
भरधाव वेगात असलेली प्रवासी कार उलटल्याने दोघे जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात हरि बारकू सोनवणे, सूर्यभान कानू गोरे, कांताबाई हरिभाऊ सोनवणे, सुनंदा कानू गोरे आणि राजेंद्र भिकनदास वैष्णव हे सर्वजण प्रवासी कारने खामगावकडे प्रवास करत होते.
औरंगाबाद येथील हरि बारकू सोनवणे (५५), सूर्यभान कानू गोरे(४०), कांताबाई हरिभाऊ सोनवणे, सुनंदा कानू गोरे आणि राजेंद्र भिकनदास वैष्णव (३५) रा. हसनाबाद हे सर्वजण एमएच २२ यू- ३२४६ या क्रमांकाच्या प्रवासी कारने खामगावकडे प्रवास करत होते. दरम्यान, अंत्रज फाट्याजवळ चालकाचे वाहनावरील नियत्रंण सुटले आणि कार पलटी होऊन अपघात झाला. यात हरि बारकू सोनवणे आणि सूर्यभान कानू गोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तिघे जण गंभीर जखमी झालेत. यातील जखमीमध्ये कांताबाई सोनवणे आणि सुनंदा कानू गोरे या महिलांसह राजेंद्र वैष्णव यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच आंत्रज येथील लोकांनी जखमींना कारमधून बाहेर काढून तत्काळ खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर तिघांनाही अकोला येथे हलविण्यात आले असून या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.