बुलडाणा- व्यापाऱ्याच्या वाहनावर गोळीबार करीत त्याला लुटल्याची घटना जिल्ह्यातील खामगाव मेहकर या मार्गावर घडली आहे. शनिवारी २७ जुलैच्या रात्री ही घटना घडली. यात चोरट्यांनी व्यापाऱ्याकडील एक लाख रुपयांची बॅग चोरून घटनास्थळावरून धूम ठोकली. पोलिसांनी जिल्हाभर नाकेबंदी करत घटनेचा तपास सुरू केला आहे.
बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले; व्यापाऱ्यांनीच चोरट्यांना लावले पिटाळून - bussinessman robbed in buldana
उटी तालुक्याच्या मेहकर येथील कैलास मोतीराम आंधळे यांचे जानेफळ येथे शिवकृपा कृषी केंद्र आहे. नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद करून ते शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या क्रुझर (एम.एच २८ झेड ४९२०) गाडीने आपल्या बंधूंबरोबर गावी परतत होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांना लुटले.
उटी तालुक्याच्या मेहकर येथील कैलास मोतीराम आंधळे यांचे जानेफळ येथे शिवकृपा कृषी केंद्र आहे. नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद करून ते शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या क्रुझर (एम.एच २८ झेड ४९२०) गाडीने आपले बंधू किशोर मोतीराम आंधळे, महादेव मोतीराम आंधळे व गोपाल दौलत धोटे, तसेच गाडी चालक शेख लतीफ शेख नूर यांच्यासमवेत आपल्या गावी परत जात होते. दरम्यान जानेफळ नजीक उटी फाटा दरम्यान असलेल्या नाल्या नजीक मोटर सायकलसह रोडवर झोपून असलेल्या तिघांनी त्यांना अडवले. अपघात झाल्याचा देखावा करीत रस्त्यावरच पडून असल्यामुळे, तसेच बाजूने गाडी काढण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रोडवर पडून असलेल्या तिघांना मदतकरण्यासाठी कैलास आंधळे गाडीबाहेर उतरले. यावेळी रस्त्यावर अपघात झाल्याचा देखावा करणाऱ्या तिघांपैकी एकाने कैलास आंधळे यांच्या गळ्याला चाकू लावला, तर इतर दोघांनी क्रुझर चालक शेख लतीफ शेख नुरा याच्या कानशिलावर रिव्हॉल्वर लावून क्रुझर गाडीची चावी काढून घेतली.
यावेळी चोरट्यांनी क्रुझरमध्ये असलेल्यांना पळून लावण्याच्या दृष्टीने गाडीवर गोळीबार केला. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर कैलास आंधळे यांनी एका दरोडेखोराच्या हाताला हिसका दिली व त्यांच्या गळ्याला लावलेला चाकू घेऊन रिवॉल्वर असलेल्या इतर दोन चोरट्यांच्या अंगावर धावले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. मात्र, जाताना चोरटे क्रुझरमधील एक लाख रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन फरार झाले. यावेळी त्यांनी आपली मोटरसायकल (एम. एच २८ एडी २७७९) जागेवरच सोडली. घटनेची माहिती मिळताच उटी येथील गावकऱ्यांची घटनास्थळावर एकच गर्दी केली होती.