विदर्भ ट्रॅव्हल अपघात प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया बुलडाणा: जिल्ह्यातील सिंदखेड राजा समृद्धी महामार्गावर रात्री दीड वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. (Buldhana Bus Accident) यावेळी त्यांनी परिसरातील गावकऱ्यांची चर्चा केली व अपघाताचे कारण जाणून घेतले. (CM Shinde and Deputy CM Fadnavis ) तसेच लक्झरी बसचा दरवाजा न उघडल्यामुळे मोठी दुर्दैवी घटना घडल्याचे सांगत प्रवाश्यांचा प्राण वाचवण्यात अपयश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अपघात पाहिल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येत आहे. अपघातानंतर गाडी घासत जाऊन त्याच्या डिझेल टॅंकला आग लागली. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू झाले. मात्र, २६ प्रवाश्यांना वाचविता आले नाही ही मोठी दुखद घटना आहे. -- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
जीवितहानी टाळू शकलो नाही:यंत्रणांकडून प्राथमिक माहिती घेतली असता संपूर्ण यंत्रणा वेळेवर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले; पण दुर्दैवाने जीवितहानी टाळू शकलो नाही. समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कसे कमी होतील याकडे सरकार प्रयत्नशील आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील 26 जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजिक पिंपळखुटा फाट्याजवळ आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला होता. दरम्यान २६ जणांचे मृतदेह ५ ॲम्बुलन्सद्वारे बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. अपघातातील मृतांची ओळख पटवण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह ठेवण्यात आले आहे.
ओळख पटवण्याकरिता 'डीएनए' चाचण्या:या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्याकरिता 'डीएनए' किंवा त्याच पद्धतीच्या वैद्यकीय चाचण्या करण्याचे गरजेचे असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. कारण ज्या पद्धतीने हा अपघात झाला आणि त्यामध्ये अक्षरशः प्रवासी भक्षस्थानी सापडले. त्यावरून त्यांचे मोबाईल देखील स्विच ऑफ येत आहेत. त्यामुळे आता ओळख पटवणे आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणे याकरता युद्ध पातळीवर प्रशासन कामाला लागले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात येऊन मृताची पाहणी केली.
एखाद्या गाडीचा अपघात होतो आणि तिला आग लागून प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू होतो, अशी घटना मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली आहे. समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा मार्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. झालेली घटना दुर्दैवी असून यात २६ कुटुंबांची हानी झाली आहे. तपासानंतर घटनेची जबाबदारी घेतली जाईल. -- गुलाबराव पाटील, पालकमंत्री, बुलडाणा
अपघात रोखण्यासाठी कडक कायदे करावे:जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मृतदेहाची पाहणी केली. त्यांनी असे अपघात रोखण्यासाठी अजून कडक कायदे करण्याची वेळ आली तर ती निश्चित केल्या जातील व दोषींना यामध्ये कठोर शासन केल्या जाईल असे बोलताना सांगितले. तसेच समृद्धी महामार्गावरून दळणवळण करताना यावर अपघात कसे रोखता येईल, याचा देखील विचार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. झालेली घटना अत्यंत मनाला खेद देणारी असून अशा भयानक अपघात भविष्यात रोखण्याकरिता सर्व त्या उपाययोजना केल्या जातील, असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
हेही वाचा:
- Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, बसमधील 26 जणांचा होरपळून मृत्यू
- Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लोखंडी पोलवर आदळली खाजगी बस त्यानंतर समृद्धी महामार्गावर घडला अनर्थ
- Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपघाताविषयी शोक व्यक्त; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 5 लाखांची मदत