महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 22, 2020, 4:50 PM IST

ETV Bharat / state

मास्क न वापरणाऱ्या 17 महाभागांना दंड; नगर परिषद, पोलिसांची संयुक्त कारवाई

आज बुधवारी 22 मार्चच्या सकाळपासून दुपारपर्यंत 17 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे 3400 रुपये दंड वसूल करण्यात आला असून अजूनही मास्क न बांधता फिरणाऱ्यांवरही दंडात्मक केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मास्क न वापरणाऱ्या 17 महाभागांना दंड ; नगर परिषद व पोलिसांची संयुक्त कारवाई

बुलडाणा- विनाकारण किंवा अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडलेल्या आणि तोंडाला मास्क न बांधलेल्या 17 महाभागांवर बुलडाणा नगर परिषद आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे दंडाची कारवाई केली आहे. आज बुधवारी 22 मार्चच्या सकाळपासून दुपारपर्यंत 17 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे 3400 रुपये दंड वसूल करण्यात आला असून अजूनही मास्क न बांधता फिरणाऱ्यांवरही दंडात्मक केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मास्क न वापरणाऱ्या 17 महाभागांना दंड ; नगर परिषद व पोलिसांची संयुक्त कारवाई

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता लॉकडाऊन काळात अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी जात असताना तोंडावर मास्क घालण्याचे आदेश आहेत. मात्र, काही महाभाग सर्रास नियमांचे उलघंन करीत आहेत. अशाच 17 जणांवर पोलीस आणि नगर परिषदेने बुलडाण्याच्या चिंचोले चौकात प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे दंडाची कारवाई केली. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमित जाधव यांच्या पथकाने आणि नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details