बुलडाणा - रस्त्यावर बंद पडलेल्या ट्रकमधून लसूण चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी बुधवारी दाखल झालेल्या तक्रारीवरून शहरातील चार चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सलीम बागवान, शे.मुस्ताक, धीरज चव्हान, विष्णू डाबेराव (सर्व रा. नांदुरा) असे लसूण चोरट्यांचे नावे आहेत. यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान विष्णू डाबेराव यास अटक केली आहे.
बुलडाण्यात लसणाची चोरी; चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल, एकास अटक - buldhana crime news
नादुरूस्त ट्रकमधून लसूण चोरुन नेल्याप्रकरणी पोलिसांनी शहरातील चार चोरट्यांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आला आहे.
अकोला येथील योगेश गणेशराव यांनी राजस्थान कोटा येथून आर.जे.१७-जी.एच.५९११ या क्रमांकाच्या ट्रकने लसूण मागवला होता. दरम्यान १० सप्टेंबरच्या रात्री ९.३० वाजेदरम्यान हा ट्रक खामगाव रोडवरील रेस्टहाऊससमोर इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडला होता. सदर ट्रक रेस्टहाऊससमोर उभा केला असता, सलीम बागवान, शे.मुस्ताक, धीरज चव्हाण, विष्णू डाबेराव यांनी ट्रकमधील अंदाजे १६०० किलोचे लसणाचे ३२ कट्टे चोरून नेले. या लसणाची बाजारातील किंमत दोन लाख रुपये आहे.
योगेश गणेशराव यांच्या तक्रारीवरुन वरील चार लसूण चोरट्यांविरुद्ध अप नं. ५६०/६० कलम, ३७९, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करुन यातील एक आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय घोडेस्वार करीत आहेत.