बुलडाणा - लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. तर बुलडाण्यात आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव या दोन्ही उमेदवारांनी विजय आपलाच होणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळणारे मतदान निर्णायक ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीला 1 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली तर याचा फटका आघाडीचे उमेदवार डॉ. शिगणेंना बसणार आहे.
बुलडाण्यात दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास; डॉ. राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांच्यात मुख्य लढत - dr rajendra shingane
लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. तर बुलडाण्यात आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव या दोन्ही उमेदवारांनी विजय आपलाच होणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळणारे मतदान निर्णायक ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीला 1 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली तर याचा फटका आघाडीचे उमेदवार डॉ. शिगणेंना बसणार आहे.
बुलडाण्यात दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास
2009 मध्ये 29 हजार मताधिक्याने प्रतापराव जाधव निवडून आले होते. तर 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांना 1 लाख 60 हजाराचं मताधिक्य मिळालं होतं.मात्र, यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून आमदार बळीराम शिरस्कार रिंगणात आहेत. जनता आपले मत कोणाच्या पदरात टाकणार हे काही तासात स्पष्ट होईल.
Last Updated : May 22, 2019, 8:20 AM IST