महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील अपघाताचे धक्कादायक कारण, फॉरेन्सिक अहवालातून समोर आली माहिती - विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात

काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात झाला होता. त्यात 25 जणांचा मृत्यु झाला होता. तो भीषण अपघात ड्रिंक अँड ड्राईव्हमुळेच झाला असल्याची धक्कादायक बाब फॉरेन्सिक अहवालातून उघड झाली आहे.

Buldhana Bus Accident
भीषण अपघात

By

Published : Jul 7, 2023, 10:17 AM IST

Updated : Jul 7, 2023, 12:47 PM IST

पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची प्रतिक्रिया

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी मार्गावर 1 जुलै रात्री एक ते दीडच्या दरम्यान विदर्भ ट्रॅव्हल्सला अपघात झाला होता. यामध्ये प्राथमिक माहितीनुसार 25 जणांचा मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याला ही खाजगी बस प्रवास करत होती. बुलढाण्यातील सिंदखेड राजा जवळ परिसरात या बसला अपघात झाला. बसमधील आठ प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर अपघात झाला होता.



बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत :अपघाताच्या वेळी बसचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची अतिशय धक्कादायक माहिती समोर आहे. अपघाताच्या वेळी बस चालक मद्यप्राशन करून बस चालवण्याचे फोरेनसिक अहवालात स्पष्ट झाले आहे. या अहवालात बस चालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार अपघाताच्या दिवशी ड्रायव्हर शेख दानिश याच्याकडून घेतलेल्यातून रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोलची मर्यादा ही कायदेशीर मान्यतेपेक्षा 30 टक्के जास्त आहे, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

अल्कोहोलची मर्यादा कायदेशीर मान्यतेपेक्षा जास्त : या अहवालात बस चालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार अपघाताच्या दिवशी ड्रायव्हर शेख दानिश याच्याकडून घेतलेल्यातून रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोलची मर्यादा ही कायदेशीर मान्यतेपेक्षा 0.30 टक्के जास्त आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे

सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आला : अपघातात मृत झालेल्या 24 जणांवर बुलढाणा येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आला होता. त्यासाठी सर्व 24 मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले होते. त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. संपूर्ण स्मशानभूमीला पोलिसांनी गराडा घातला होता. स्मशानभूमी परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. एका मृतदेहावर मुस्लिम धार्मिक पद्धतीने करण्यात अंत्यसंस्कार झाला होता. अपघातात मृत झालेल्या आयुष गाडगे, कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इंशांत गुप्ता, गुडीया शेख, अवंती, पोहनकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृक्षाली वनकर, ओवी वनकर, शोभा वनकर या व्यक्तींची आतापर्यंत ओळख पटली होती.

हेही वाचा :

  1. Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लोखंडी पोलवर आदळली खाजगी बस त्यानंतर समृद्धी महामार्गावर घडला अनर्थ
  2. Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अपघाताविषयी शोक व्यक्त; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 5 लाखांची मदत
  3. Buldhana Bus Accident: अपघातातील २४ मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार, एक मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला, स्मशानभूमिला छावणीचे स्वरुप
Last Updated : Jul 7, 2023, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details