महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बनावट फेसबुक खात्यावरून अश्लील फोटोसह कमेंट टाकून मागितली खंडणी, महिलेस मुंबईतून अटक

एका महिलेने बनावट फेसबुक खाते तयार करून दुसऱ्याच्या मुलीचे फोटोसह अश्लील कमेंट केली. ती कमेंट हटविण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणी मागितली. त्या महिलेस मुंबईतून अटक केली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

अटकेत असलेली महिला
अटकेत असलेली महिला

By

Published : Dec 15, 2019, 11:50 PM IST

बुलडाणा- एका महिलेने बनावट फेसबुक खाते तयार करून दुसऱ्याच्या मुलीचे फोटोसह अश्लील कमेंट केली. ती कमेंट हटविण्यासाठी 5 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या महिलेस अटक केली आहे. नलिनी अंकुश देव्हडे, असे महिलेचे नाव असून तिला बुलडाणा पोलिसांनी मुंबईच्या सावडी नाका, कांबळे मार्ग खारदेव पोलीस चौकीजवळील भाजी मंडई गवंडी येथून अटक केली आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे.

माहिती देताना ठाणेदार

येळगाव येथील आदिवासी आश्रम शाळेवर लिपिक पदावर कार्यरत असणाऱ्या गजानन शंकर मुळे यांचे मुंबई येथील नलीनी देव्हडे यांच्यात जमिनीची सौदेबाजी व्यावसायिक संबध होते. या संबधातून दोघांमध्ये वाद-विवाद झाले. दरम्यान, 2 ते 3 बनावट वेगवेगळ्या नावाने फेसबुक वापरून नलिनी यांने गजानन मुळे यांची 20 वर्षीय मुलीचे फोटोसह अश्लील कमेंट अपलोड केले. ते अपलोड केलेले फोटो व कमेंट काढण्यासाठी नलिनी देव्हडे यांनी 5 लाखांची मागणी केल्याची तक्रार मुळे यांनी बुलडाणा शहर पोलिसात केली. यावरून नलिनी देव्हडे या 45 वर्षीय महिलेवर कलम 384 आणि सायबर क्राईम 67 अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ती सध्या पोलीस कोठडीत आहे. ते बनावट फेसबुक खाते कोठून आणि कोणत्या आयपी अॅड्रेसवरून तयार करण्यात आले याचा तपास बुलडाणा शहर पोलीस करत आहे.

हेही वाचा - दारूबंदीसाठी एकवटली नारीशक्ती, दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त

ABOUT THE AUTHOR

...view details