बुलडाणा -आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे. ही यात्रा गुरूवारी बुलडाणा जिल्ह्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले.
आदित्य ठाकरेंची यात्रा जनआशीर्वादासाठी की फडणवीस सरकारची पोलखोल करण्यासाठी? आदित्य ठाकरेंच्या सभेत बळीराजाची कमाल
बुलडाण्यातील सभेत आदित्य ठाकरेंनी सरकारने केलेली कर्जमाफी तुमच्यापर्यंत पोचली का? असा सवाल केला. मात्र, यानंतर लोकांनी आम्हाला कर्जमाफी मिळालीच नाही अशी आरोळी उठवली. यात एका शेतकऱ्याने आदित्य ठाकरे यांना समोरासमोर प्रतिउत्तर द्यायला सुरुवात केली. यानंतर या शेतकऱ्याला स्टेजवर बोलावत त्याच्या सोबत ठाकरेंनी चर्चा केला. शेवटी आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी करू, असे जाहीर आश्वासन दिले. सोबतच या शेतकऱ्याच्या धाडसाबद्दल त्याचा सत्कार केला.
जनआशिर्वाद यात्रेतील सभेत शेतकऱ्याच्या धाडसाबद्दल सत्कार बंजारा समाजाकडून आदित्य यांचा पारंपारिक पोषाखात सत्कार
बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. यांनतर जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीने ठाकरे यांना पारंपरिक पोशाख भेट दिला. तसेच आदित्य यांनी तो मंचावर परिधानही केला.
आदित्य ठाकरेंचा बंजारा समाजाकडून सत्कार ही जनआशीर्वाद यात्रा नसून तीर्थयात्रा - आदित्य ठाकरे
सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडविण्यासाठी ही जनआशीर्वाद यात्रा असून ही माझ्यासाठी तीर्थयात्रा असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. तीर्थयात्रा करायची असेल तर ती मंदिरात जाऊन करतात मात्र लोकसभा निवडणुकीत जनतेने जो काही विश्वास शिवसेनेवर दाखवला. त्या लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आलो आहे, असे उद्गार आदित्य यांनी यावेळी काढले.
हेही वाचा... जनआशिर्वाद यात्रा : आदित्य ठाकरेंचे बुलडाण्यात भावी मुख्यमंत्री म्हणून स्वागत
सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी देणारच - आदित्य ठाकरे
राज्यात, देशात युतीचे सरकार आले, कर्जमुक्तीची घोषणा झाली. मात्र, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळालीच नाही, असे सांगत ठाकरे यांनी युती सरकारवरच हल्ला चढवला. शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप करत सरसकट कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नसल्याचा इशारा यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा...आखाडा विधानसभेचा : खामगाव विधानसभेसाठी होणार तिरंगी लढत; वंबआची भूमिका ठरणार परिणामकारक
हेही वाचा...बुलडाण्यात जन आशीर्वाद यात्रे दरम्यान आदित्य ठाकरेंसमोर शिवसेनेचे दोन गट उघड..