महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कौतुकास्पद! बुलडाण्याच्या मिहिर अपारची यशस्वी तिरंदाजी, भारताला मिळाले सुवर्णपदक - बुलडाणा मिहिर अपार

भारतीय युवा संघाचे तीन खेळाडू अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर शनिवारी 14 ऑगस्ट रोजी त्यांची अमेरिकेच्या संघाची रोमहर्षक अंतिम लढत झाली आणि यामध्ये भारतीय संघाने अटी-तटीच्या फरकाने अमेरिकेवर मात मिळवली.

मिहिर
मिहिर

By

Published : Aug 15, 2021, 7:10 PM IST

Updated : Aug 15, 2021, 7:15 PM IST

बुलडाणा - ऑलिम्पिकमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भाला फेकून देशाला सुवर्ण मिळवून दिले. त्यापाठोपाठ युरोपामधील पोलंडमध्ये 18 वर्षाखालील जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतचे आयोजन 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान केले होते. यामध्ये भारतीय युवा संघाचे तीन खेळाडू अंतिम फेरीत दाखल झाल्यानंतर शनिवारी 14 ऑगस्ट रोजी त्यांची अमेरिकेच्या संघाची रोमहर्षक अंतिम लढत झाली आणि यामध्ये भारतीय संघाने अटी-तटीच्या फरकाने अमेरिकेवर मात मिळवली. अमेरिकेवर मात करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला पुन्हा भारताचा तिरंगा सातासमुद्रापार फडकवून भारतीय राष्ट्रगीताची धून वाजवली आहे.

बुलडाण्याच्या मिहिर अपारची यशस्वी तिरंदाजी
भारतीय संघाने 233 विरुद्ध 230 अशा फरकाने अमेरिकेवर केली मात

भारतीय संघाची अमेरिकेच्या संघाशी रोमहर्षक अंतिम लढत झाली. 9 राऊंडमध्ये 240 तिर चालविताना भारतीय संघाने 233 विरुद्ध 230 अशा फरकाने अमेरिकेवर मात करत चित केले. सर्वात अभिमानास्पद बाब म्हणजे भारतीय संघाचे नेतृत्व करणारा मिहीर अपार हा बुलडाणा येथील आहे. भारतीय तिरंदाजी संघात बुलडाण्याच्या मिहीर अपारसह हरियाणाचा कुशल दलाल व उत्तरप्रदेशचा साहिल चौधरी हे खेळाडू होते. विशेष म्हणजे भारतीय टीमचे प्रशिक्षक चंद्रकांत ईलक हे देखील बुलडाण्याचे आहेत.

मिहीर 14 वर्षाखाली ठरला होता धनुर्विद्यासाठी पात्र

बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील शिक्षक कॉलनी येथील मिहीर अपारने लहानपणापासूनच चंद्रकांत ईलक यांच्या मार्गदर्शनात धनुर्विद्या या खेळासाठी अथक परिश्रम घेतले आणि 14 वर्षाखालील भारतीय संघासाठी तो पात्र ठरला.

अशा पद्धतीने पटकाविला सुवर्ण पदक

अमेरिकेच्या संघासोबत अंतिम फेरीत खेळताना प्रत्येक राऊंडमध्ये अमेरिकेचा पाठलाग करण्याचे लक्ष समोर असताना, शेवटचा बाण हा मिहीरच्या हाती येत होता. प्रत्येकवेळी अमेरिकेच्या लक्ष्याचा पाठलाग करून त्यामध्ये घेतलेली आघाडी ही खूप कौतुकास्पद होती. शेवटच्या फेरीत भारताला अमेरिकेच्या 330 स्कोरला पार करायचे होते. भारताकडे 310 स्कोर असताना 20 स्कोरच्या वर मिहीरने तीर मारत 330 चा स्कोर घेतला व भारताला सुवर्णपदक प्राप्त करता आले.

Last Updated : Aug 15, 2021, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details