महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरोग्य विभागाच्या परिपत्रका विरोधात आयएमए डॉक्टरांकडून रजिस्ट्रेशन प्रतींची होळी - शासनाच्या परिपत्रकाची डॉक्टरांकडून होळी

डॉक्टरांचा सल्ला न घेता 31 ऑगस्टला आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकाविरोधात आयएमएकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आयएमएच्या डॉक्टरांनी आंदोलन केले. यावेळी मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतींची होळी करण्यात आली.

ima doctors protest
राज्य सरकारविरोधात आयएमएचे आंदोलन

By

Published : Sep 11, 2020, 4:51 PM IST

बुलडाणा- राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 31 ऑगस्टच्या परिपत्रकातील सूचनांच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आय.एम.ए.) वतीने डॉ. जे. बी. राजपूत यांच्या नेतृवात आज सकाळी 11 वाजता स्थानिक जयस्तंभ चौकात आंदोलन करण्यात आ ले. यावेळी आयएमएच्या डॉक्टरांनी एकत्र येत मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतींची होळी केली. यावेळी शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

राज्य सरकारविरोधात आयएमएचे आंदोलन

राज्य सरकारचे धोरण डॉक्टरांच्या विरोधात आहे. वारंवार कायदे लादण्यात येत आहेत. संपूर्ण देशात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 600 डॉक्टरांचा मृत्यू झाला. त्यापैकी 300 डॉक्टरांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे, अशी माहिती डॉ.जे.बी.राजपूत यांनी दिली. आयएमएच्या सूचनांना राज्य शासनाने प्रतिसाद दिलेला नाही. 31 ऑगस्टपूर्वी जे दर होते ते लागू करावेत. कोरोना संकटात मृत्यू झालेल्या डॉक्टरांना सन्मानपत्र द्यावे. 50 लाखांचा मान्य केलेला विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी राजपूत यांनी केली आहे.

हेही वाचा-आरोग्य विभागाच्या परिपत्रकाविरोधात 'आयएमए' आक्रमक; बुलडाण्यात एमसीआयच्या रजिस्ट्रेशनची करणार होळी

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 31 ऑगस्टच्या परिपत्रकातील सूचनांनुसार रुग्णालय चालवणे आणि रुग्णांना उपचार देणे अव्यवहार्य आणि अशक्य असल्याने, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 4 सप्टेंबरला झालेल्या राज्यस्तरीय प्रतिनिधी परिषदेत सदर परिपत्रक पूर्णपणे फेटाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. याबाबत आयएमने महाराष्ट्र सरकारकडे वेळोवेळी मागण्या मांडल्या. मात्र, या केलेल्या मागण्यांकडे शासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ 7 सप्टेंबरपासून राज्यात सर्वत्र संघर्षाचा पवित्रा घेत विविध मार्गाने लढा सुरू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर अन्यायकारक रुग्णालय दरांविरोधात बुलडाण्यात आज सकाळी 11 वाजता जयस्तंभ चौकात आयएमएचे केंद्रीय सदस्य जे.बी.राजपूत यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी एकत्र येवून मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशनच्या प्रतींची होळी केली.

डॉक्टरांनी शासनाच्या व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. शासनाने रुग्णालयाचे जे दर ठरवले आहेत.ते रद्द करून 31 ऑगस्टच्या पूर्वीचे दर लागू करावेत आणि आयएमएशी चर्चा करूनच लागू करावेत. नको ते कायदे आयएमएवर लादलेले आहेत ते रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details