महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 14, 2019, 12:02 AM IST

ETV Bharat / state

चांद्रयान २ संदर्भात आम्ही 'इस्रो'सोबत: असा संदेश देत लक्ष्मीनारायण ग्रुपच्या गणपतीचे विसर्जन

बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नामांकीत 'लक्ष्मीनारायण ग्रुप'च्या गणपतीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. यावेळी मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे सामजिक संदेश देण्यात आले. विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये चांद्रयान २ संदर्भात आम्ही सर्व इस्रोच्या सोबत आहोत असा संदेश देण्यात आला.

लक्ष्मीनारायण ग्रुपच्या गणपतीचे विसर्जन

बुलडाणा -बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नामांकीत 'लक्ष्मीनारायण ग्रुप'च्या गणपतीचे शुक्रवारी विसर्जन करण्यात आले. यावेळी मिरवणुकीमध्ये विविध प्रकारचे सामजिक संदेश देण्यात आले. विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये चांद्रयान २ संदर्भात आम्ही सर्व इस्रोच्या सोबत आहोत असा संदेश देण्यात आला.

लक्ष्मीनारायण ग्रुपच्या गणपतीचे विसर्जन

हेही वाचा - गणेश विसर्जन : तब्बल २२ तासांच्या भव्य मिरवणुकीनंतर लालबागचा राजा अरबी समुद्रात विसावला

यावेळी सर्वधर्म समभाव पेहराव करत लेक वाचवा लेक शिकवा, स्त्री भ्रूण हत्त्या, अंधश्रद्धा निर्मूलन, झाडे लावा झाडे जगवा, दारू मुक्त महाराष्ट्र, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, प्लॅस्टीक बंदी अशा विषयांबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच शहरातील प्रमुख मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी १० वेगवेगळ्या प्रकारचे पथनाट्य सादर केले. महिलांचे ढोलतासे पथक, लेझीम पथक तसेच महापुरुषांच्या वेशात लहान मुले देखील सहभागी झाले होते. हा प्रकार मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरला. तर सोबतच चांद्रयान २ चा देखील देखावा तयार करण्यात आला होता. संपूर्ण देश हा इस्रोच्या पाठीशी असून त्यांचे मनोबल वाढण्यासाठीचा देखावा साकारला होता.

हेही वाचा - गणपती बाप्पा मोरया..! मुंबईत 38 हजार 260 गणेश मूर्तींचे विसर्जन

ABOUT THE AUTHOR

...view details