बुलडाणा -नाशिक जिल्ह्यातील सेनगाव जवळ खड्ड्यात कार कोसळल्याने बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये लोणार तालुक्यातील खडेगांव व पळसखेड या गावातील अंकुश गायकवाड, त्र्यंबक थोरवे अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अन्य दोघांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. मृत्यू झालेले चौघेही शिक्षक असून ते मुख्यालयीन जाण्यासाठी निघाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीमध्ये स्पष्ट झाले आहे.
बुलडाणा : खड्ड्यात कार कोसळून चार शिक्षकांचा मृत्यू - चार शिक्षकांचा अपघातात मृत्यू
सेनगाव ते येलदरी महामार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्त्याच्या बाजूलाच मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात रविवारी मध्यरात्री एक कार पडली. खड्ड्यातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे कार बंद झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही आणि कारमध्येच गुदमरुन चार जणांचा मृत्यू झाला आहे.
![बुलडाणा : खड्ड्यात कार कोसळून चार शिक्षकांचा मृत्यू कार कोसळून चार शिक्षकांचा मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12128106-thumbnail-3x2-bul.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव ते येलदरी महामार्गाचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्त्याच्या बाजूलाच मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात रविवारी मध्यरात्री एक कार पडली. खड्ड्यातील पाण्यामध्ये कार उलटी झाल्याने पूर्णपणे कार बंद झाली. त्यामुळे कारमधील कोणालाही बाहेर निघता आले नाही आणि कारमध्येच गुदमरुन चार जणांचा मृत्यू झाला आहे.
अशी आली घटना उघडकीस
दरम्यान, खड्डयामध्ये कारचा लाइट दिसत असल्याने काही गावकऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक कार त्यात पडलेली दिसून आली. गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन गावकऱ्यांच्या मदतीने वाहनातील चारही मृतदेह बाहेर काढले. मृतदेह सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. यामध्ये दोन मृतदेहाच्या खिशात असलेल्या आधारकार्डवरून दोघांची ओळख पटली आहे, तर इतर दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. जूनपासून शाळा सुरु होत असल्याने शिक्षकांना मुख्यालयी बोलावण्यात आले आहे. त्यामुळे हे चौघे जण मुख्यालयी उपस्थित राहण्यासाठी जात असावे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.