महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; पूरग्रस्तांना केली श्रध्दांजली अर्पण - पालकमंत्री डॉ.संजय कुटे

७३ व्या भारतीय स्वातंत्र्यदिना निमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला.

७३ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला.

By

Published : Aug 15, 2019, 8:16 PM IST

Updated : Aug 15, 2019, 11:07 PM IST

बुलडाणा- ७३ वा भारतीय स्वातंत्र्यदिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

७३ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचा शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात कामगारमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.संजय कुटे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या ध्वजारोहण कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ.निरुपमा डांगे, पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी-अधिकारी शनमुखराजन यांसह शासकीय कर्मचारी व विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूर, सांगली येथील पुरात मरण पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच तंबाखू मुक्तीची शपथ यावेळी देण्यात आली.

Last Updated : Aug 15, 2019, 11:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details