महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांचे मुंडन आंदोलन; तब्बल ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांची कुचेष्टा - जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे

याआगोदर शेतकऱ्यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. अन्यथा कर्ज मिळत नसेल तर इच्छामरणाची परवानगी मागितली होती. शेवटी शेतकऱ्यांनी मुंडन करूम सरकार आणि बँक प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.

कर्जासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांचे मुंडण आंदोलन

By

Published : Sep 11, 2019, 9:00 PM IST

बुलडाणा -घाटनांद्रा आणि ढासाळडी दोन गावांना दत्तक घेणाऱ्या ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स या बँकेने गेल्या ४ महिन्यांपासून शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंडन आंदोलन केले. त्यांनी बँकेसमोरच केस कापून बँकेच्या अधिकाऱ्यांना निषेध म्हणुन केस भेट दिले व बँकेवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. तर बँक व्यवस्थापक लालचंद मेश्राम म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाबाबत वरिष्ठांना कळवले आहे. मंजुरी मिळताच कर्ज दिले जाईल.

कर्जासाठी बँकेसमोर शेतकऱ्यांचे मुंडण आंदोलन

हेही वाचा - बुलडाण्यात बँकेकडून कर्जसाठी शेतकऱ्यांची चेष्टा; शेतकऱ्यांनी इच्छामरणाची मागितली परवानगी

बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीत निर्णय घेतल्या नंतर वरिष्ठांकडून मंजूरीचे आदेश प्राप्त होताच कर्ज दिल्याजाणार असल्याची प्रतिक्रिया व्यवस्थापक लालचंद मेश्राम यांनी दिली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील ढासाळवाडी व घाटनांद्रा येथील २१ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना मागील चार महिन्यांपासून वारंवार कर्जाची मागणी करूनही पीककर्ज दिले नाही असे शेतकरी सांगत होते. तर दुसरीकडे व्यवस्थापक याबद्दल हमी देताना म्हणाले, शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत अर्धवट कर्जमाफी मिळाल्याने यावर तोडगा काढत शेतकऱ्यांकडून ओरिएन्टल बँकेत सेटलमेंट ची रक्कम भरून घेतली आहे. तसेच शेतकऱ्यांना दुसरे कर्ज दिले जाईल अशी हमी बँक व्यवस्थापकाने दिली.

हेही वाचा - शेतकऱ्यांचे ५१ हजार कोटी गेले कुठे? हार्दिक पटेलांचा सरकारला सवाल

चार महिन्याचा कालावधी लोटूनही कर्ज मिळाले नसल्याने शेतकरी हतबल झाले व शवटी त्यांनी अशा प्रकारच्या आंदोलनाचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनी याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्याकडे दिली मात्र, कोणतीच कारवाई झाली नाही. शेवटी शेतकऱ्यांनी अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करून कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली. अन्यथा कर्ज मिळत नसेल तर इच्छामरणाची परवानगी मागितली होती. शेवटी शेतकऱ्यांनी मुंडन करूम सरकार आणि बँक प्रशासनाचा निषेध नोंदवला आहे.

हेही वाचा - मंगरुळपीर येथील ग्रामसेवकांचे 'मुंडन' आंदोलन करुन शासनाचा निषेध

ABOUT THE AUTHOR

...view details