बुलडाणा -जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघातील मतदान यंंत्रेनेची संपुर्ण तयारी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार पडाव्यात, यासाठी 7 मतदार संघाकरिता 11 हजार 315 कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 216 क्षेत्र असून प्रत्येक क्षेत्राकरीता एक याप्रमाणे 216 क्षेत्रिय अधिकारी व 27 राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 243 क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.
बुलडाणा जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज हेही वाचा - बविआ-महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, प्रदीप शर्मा पैसे वाटत असल्याचा आरोप
जिल्ह्यामध्ये एकूण 653 मतदान केंद्रे मुस्लीम बहुल असल्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप आणि मतदान माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले आहे. एकुण 20 लक्ष 41 हजार 712 मतदारांची नोंद असून जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील, अशा प्रशासनाला आशा आहे.
मतदानाच्या अगोदरच्या दिवशी व मतदानाच्या दिवशी लागणाऱ्या 686 वाहनांना जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात येणार आहे. त्यापैकी 258 एसटी बसेस, 42 मिनी बसेस आहेत. तसेच 269 शासकीय वाहनांना यापूर्वीच जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम लावण्यात आले आहे. शिवाय मतदान सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली असून अडीच हजारांपेक्षा जास्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा - वरळी मतदारसंघात चार कोटींची संशयास्पद रक्कम जप्त