महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन करणार पूरग्रस्त भागातील ५ गावांना मदत - maharashtra gov

सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त भागाला राज्यात कानाकोपऱ्यातून मदत येत आहे. यातच बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ५ पूरग्रस्त गावांना १० लाखांची मदत  करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही घोषणा केली.

राधेश्याम चांडक अध्यक्ष - बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन

By

Published : Aug 15, 2019, 10:38 AM IST

बुलडाणा -सांगली आणि कोल्हापूर या पूरग्रस्त भागाला राज्यात कानाकोपऱ्यातून मदत येत आहे. यातच बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशनने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ५ पूरग्रस्त गावांना १० लाखांची मदत करणार आहे. फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी ही घोषणा केली.

बुलडाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन करणार पूरग्रस्त भागातील ५ गावांना मदत

पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे मोठी आपत्ती निर्माण झाली असून आपत्तीतून सावरण्यासाठी शासन स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. तसेच वेगवेगळ्या सामाजिक संस्थादेखील मदत करत आहे. या पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून बुलडाणा जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशनच्यावतीने सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त पलूस तालुक्यातील बेलवडी, वसंडे, ब्रह्मनाळ, बुरजी व खटाव या ५ गावांना मदत देण्याचा निर्णय झाला आहे.

पुनर्वसनाचे हे काम २ ते ३ दिवसात राज्य फेडरेशनाच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात येणार असून या कामात जास्तीत जास्त पतसंस्थांनी सहभाग नोंदवावा व जास्तीत जास्त रोख स्वरुपात मदत करावी असे आवाहन चांडक यांनी केले आहे. जमा झालेल्या निधीतून पूरग्रस्तांना १५ दिवसांसाठी धान्याचे किट, गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. या गावांच्या मदतीसाठी बुलडाणा जिल्ह्यातून १० ते १२ लाख रुपये पाठवण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details