बुलडाणा -गेल्या दहा महिन्यांपासून देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. मात्र आता कोरोनाची लस उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. लसीकरणाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी लसीकरण केले. ही लस पूर्णपणे सुरक्षीत असून, प्रत्येक नागरिकाने कोरोनापासून बचावासाठी ही लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्यासोबत जिल्हा क्षय आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद जाधव यांनीही यावेळी लस घेतली.
16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सहा केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. आज आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी ही लस घेतली. कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षीत असून, प्रत्येक नागरिकाने ही लस घ्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.