बुलडाणा -ग्राहकमंचने दिलेला दंड भरण्याचा निकाल अमान्य करणाऱ्या महावितरणच्या एका कंत्राटदाराला जिल्हा ग्राहक मंचने दोन वर्षांची कैद आणि 10 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शेतकरी ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी ग्राहकमंचाने त्या कंत्राटदारास भरपाई रक्कम देण्याचे आदेश दिले होते. दामोदर डहाके, असे या शिक्षा सुनावलेल्या कंत्राटदाराचे नाव आहे. बुलडाणा जिल्हा ग्राहक मंचने गुरुवारी 12 डिसेंबरला ही शिक्षा सुनावली आहे.
बुलडाणा जिल्हा ग्राहक मंचाकडून ग्राहकाची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई हेही वाचा... पालघरच्या चारोटी येथे 'बर्निंग कार'चा थरार
चिखली तालुक्यातील सावरगांव डुकरे येथील प्रदिप अपार यांनी सन 2009 मध्ये विद्युत महावितरणच्या 1.3 योजनेतंर्गत स्वतःच्या शेतात विद्युत खांबासाठी विद्युत मंडळाकडे अर्ज सादर केला होता. महावितरणने विद्युत जोडणीसाठी 3 कोटेशन मंजूर करून भरणा करायला सांगितले होते. दरम्यान, महावितरणचे कंत्राटदार दामोदर नामदेवराव डहाके यांच्यासोबत करार करून 8 हजार रुपये नगद देण्यात आले होते. मात्र, डहाके यांनी विद्युत खांबाचे काम न करता ते अर्धवट स्थितीत ठेवले.
हेही वाचा... 'नागरिकत्व सुधारणा कायद्या सेनेने राज्यात स्वीकारावा, भाजप राजकीय तडजोड करायला तयार'
शेतकरी प्रदीप अपार यांनी याबाबत कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याची विनंती केली. मात्र, कंत्राटदाराने टाळाटाळ केली. त्यामुळे प्रदिप अपार यांनी बुलडाणा येथील जिल्हा ग्राहक मंचात 2011 मध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा निकाल 31 ऑक्टोबर 2015 ला देण्यात आला होता. ज्यात दामोदर डहाके यांना 8 हजार रुपये व 14 जानेवारी 2009 पासून 9 टक्के व्याजदराने प्रदिप अपार यांना देण्यास सांगितले होते. तसेच 10 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 5 हजार रुपये न्यायालयाचा खर्च देण्याचे आदेश दिले होते. तरीही डहाके यांनी आदेशाची पूर्तता केली नाही. मंचचा निकाल अमान्य केला म्हणून ग्राहक संरक्षण कायद्यान्वेये ग्राहक मंचने गुरुवारी दामोदर डहाके याला 2 वर्षे साधी कैद आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा... B'Day Spl: 'क्लॅपर बॉय' ते 'शो मॅन', 'असे' घडले राज कपूर