महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा: सैय्यद वसीम रिझवींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - Buldana District Latest News

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील शिया सेंटर बोर्डचे तत्कालीन चेअरमन सैय्यद वसीम रिझवी यांनी पवित्र कुराणबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम बांधवांनी केला आहे. याविरोधात बुलडाण्यात मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. वसीम रिझवी यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सैय्यद वसीम रिझवींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
सैय्यद वसीम रिझवींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By

Published : Mar 16, 2021, 8:10 PM IST

बुलडाणा - उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील शिया सेंटर बोर्डचे तत्कालीन चेअरमन सैय्यद वसीम रिझवी यांनी पवित्र कुराणबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लिम बांधवांनी केला आहे. याविरोधात बुलडाण्यात मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. वसीम रिझवी यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप

पवित्र कुराणमधील 26 वी आयात हटवण्याची मागणी रिझवी यांनी सर्वेच्च न्यायालयात केली होती. रिझवी यांच्या या मागणीमुळे भारतातील मुस्लिम समाज दुखावला गेला आहे. हा मुस्लिम समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे रिझवी यांच्यावर गुन्हा दाखल करून, त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी बुलडाण्यातील मुस्लिम बांधवांनी केली आहे.

सैय्यद वसीम रिझवींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

हेही वाचा -राज्यात आरटीई प्रवेशासाठी 1 लाख 36 हजार अर्ज

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details