बुलडाणा - नगर परिषेदेच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद या लवकरच भारिप बहुजन पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सुचक वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. आज (19 जानेवारी) अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नागरी सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
या वृत्ताला नजमुन्नीसा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांन दुजोरा दिला आहे. नगर परिषेदेत नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आणि सरकार वेगळ्या पक्षाचे असल्याकारणाने निधी मिळत नाही. त्यामुळे शहराच्या विकासासाठी हे मार्ग अवलंबणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.