बुलडाणा - बुलडाणा विधानसभा मतदार संघात भाजप-सेनेच्या महायुतीसोबत बंडखोरी करत भाजपचे योगेंद्र गोडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचार बॅनरवर संपूर्ण भाजप प्रणित कलर असून चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे फोटो टाकून भाजपची टॅगलाईन 'सबका साथ...सबका विकास... सबका विश्वास' टाकत मतदारसंघात बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळेच बुलडाण्यात खरंच भाजप-शिवसेना युती धर्म पळला जात आहे का..? की बंडखोर उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे, अशा आशयाची बातमी प्रकाशित ईटीव्ही भारतने केली होती. याची दखल घेत अखेर भारतीय जनता पक्षाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे योगेंद्र गोडेवर कार्यवाही करण्यासंदर्भात बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
ईटीव्ही भारतचा इंपॅक्ट: अखेर भाजपचे बडखोर अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडेवर कार्यवाहीची मागणी - Election Commission Latest News
बुलडाण्यात खरंच भाजप-शिवसेना युती धर्म पळला जात आहे का..? की बंडखोर उमेदवाराला भाजपकडून अप्रत्यक्ष पाठिंबा दिला जात आहे, अशा आशयाची बातमी प्रकाशित ईटीव्ही भारतने केली होती. याची दखल घेत अखेर भारतीय जनता पक्षाचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे योगेंद्र गोडेवर कार्यवाही करण्यासंदर्भात बुधवारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
या पत्रकात भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी आरोप केला आहे की, बुलडाणा मतदारसंघात शिवसेना, भाजप, रिपाई, शिवसंग्राम, रासप, रयत क्रांती संघटना, या महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजप व सेनेसह सर्व मित्र पक्ष मागील कित्तेक दिवसापासून गायकवाड यांचा प्रचार करत आहेत.
याच मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते व अपक्ष उमेदवार योगेंद्र राजेंद्र गोडे हे देखील निवडणूक लढवत आहेत. मात्र, गोडे यांनी आपल्या प्रचारात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप चे नेते एकनाथ खडसे यांच्या छायाचित्राचा वापर केला आहे. त्यामुळे मतदारामध्ये भ्रम निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्यावर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी करत ते बॅनर हटवण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. या तक्रारीवर जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.